दिग्दर्शक राजीव पाटील यांना द्या भावपूर्ण श्रद्धांजली

सामाजिक भान जपणाऱ्या आणि मराठी सिनेमांची पताका राष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या संवेदनशील मराठी दिग्दर्शकाला द्या भावपूर्ण श्रद्धांजली....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 30, 2013, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सामाजिक विषयांवर आशयघन चित्रपट बनवणारे मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आहे. मुंबईतील भगवती रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ७२ मैल- एक प्रवास हा त्यांचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. मराठीतील साहित्यकृतींवर चित्रपट बनवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. `सावरखेड एक गाव`, `सनई- चौघडे`, `पांगिरा`, `जोगवा` हे त्यांचे चित्रपट गाजले होते. `जोगवा` चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. `वंशवेल` या नव्या सिनेमाचं ते दिग्दर्शन करत होते.
अशा सामाजिक भान जपणाऱ्या आणि मराठी सिनेमांची पताका राष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या संवेदनशील मराठी दिग्दर्शकाला द्या भावपूर्ण श्रद्धांजली....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.