आमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री

मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. 

Updated: Jan 30, 2015, 07:23 PM IST
आमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री title=

मुंबई: मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. 

जागतिक बँक आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधीही या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. कालबद्ध वेळेत मुंबईतील पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याबाबतही यात भर दिला जाणार आहे.. पूर्वीच्या सरकारनं मुंबईसाठी केवळ व्हिजन आखलं होतं. आमचं सरकार 'व्हिजन विथ अॅक्शन' करून मुंबईचा विकास करणार असल्याचं सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सरकारवर टीका केली.

तर ठाणे जिल्ह्यातल्या कळव्यात बीकेसीसारखं व्यापारी संकूल उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तब्बल ७२ एकर जमिनीवर हे व्यापारी संकूल उभं राहणार आहे. कळव्यातले नियोजित क्रीडा संकूल, प्रशासकीय इमारती आणि कन्व्हेंशन सेंटर रद्द करून त्या जागेवर बीकेसीसारखे व्यापारी संकूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री,  स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारे लोंढे पाहता शहरातल्या व्यवस्थेवर ताण पडतोय. त्यामुळं काही व्यावसायिक गोष्टींचं विकेंद्रीकरण करून ते मुंबईबाहेर नेल्यास शहरावरील ताण कमी करण्यास मदत होईल, अशी यामागची सरकारची भूमिका आहे. 

दरम्यान, शिवसेना भाजपमध्ये चांगला समन्वय असल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज स्पष्ट करावं लागलं. मात्र हे स्पष्ट करतानाच या दोन पक्षात एक समन्वय समितीही येत्या तीन दिवसांत स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विशेषतः रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर तिखट टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनीही भाजपला 'बाळकडू' पाजण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर बोलण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. सामनातल्या टीकेवर मात्र त्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.