मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांनी मागणी केलीय.
विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आज सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू आसिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आ.प्रा. जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश असणार आहे.
'वस्तू व सेवा कर' विधेयक अंमलात आणण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीनं आयोजित केले जात आहे. त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी विधानमंडळाचं विशेष अधिवेशन बोलाविण्याची आवश्यकता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलविण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांचे नेते करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय.