हेमा उपाध्याय प्रकरण : एका संशयिताला अटक

कलाकार हेमा उपाध्याय यांच्या हत्येप्रकरणी वारणसीतून एका संशयिताला अटक करण्यात आलीय. वाराणसी पोलिस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या संशयिताला अटक करण्यात आलीय. संशयिताकडे काही हत्यारंही सापडली आहेत. 

Updated: Dec 14, 2015, 04:33 PM IST
हेमा उपाध्याय प्रकरण : एका संशयिताला अटक title=

मुंबई : कलाकार हेमा उपाध्याय यांच्या हत्येप्रकरणी वारणसीतून एका संशयिताला अटक करण्यात आलीय. वाराणसी पोलिस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या संशयिताला अटक करण्यात आलीय. संशयिताकडे काही हत्यारंही सापडली आहेत. 

शिवकुमार असे या संशयिताचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय. त्याच्यासह या प्रकरणात आणखी दोन जणांचा समावेश होता. पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.  शिवकुमारने केलेल्या खुलाश्यानुसार हेमाचे तिच्या पतीशी चांगले संबंध नव्हते अशी माहिती मिळालीये.
 
शनिवारी कांदिवलीच्या उच्चूभ्रू डहाणूकर वाडीत दुहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली होती. कलाकार हेमा आणि त्यांचे वकील हरिश बंबाणी यांचे मृतदेह पोत्यात बांधून नाल्यात फेकून देण्यात आले होते. मृतांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.