मानखुर्दमध्ये सापडला दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह

मुंबईच्या मानखुर्द या भागातील महाराष्ट्र नगर येथे एका दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजलीय.

Updated: Mar 11, 2015, 10:52 AM IST
मानखुर्दमध्ये सापडला दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह title=

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द या भागातील महाराष्ट्र नगर येथे एका दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजलीय.

मृत मुलगा हा ७ तारखेला हरवल्याची तक्रार त्याच्या आईने ट्रॉम्बे पोलिसांत दाखल केली होती. दोन दिवस पोलीस मुलाचा शोध घेत होते. मात्र, मुलाचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात शोककळा पसरली.

ट्रॉम्बे पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. लवकरच गुन्हेगाराला अटक होईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.