मुंबई : स्वत:ला मुंबईचा कैवारी समजणारे आणि गेल्या दोन दशकापासून मुंबई महापालिकेची सत्ता हातात ठेवणाऱ्यांना अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाल्याचे काहीच दु:ख नाही का? अशी शंका निर्माण होतेय.
काळबादेवी आग दूर्घटनेतील जखमी अधिकारी सुधीर अमीन यांचा मृत्यू झाल्यानंतर भायखळा अग्निशमन केंद्रात त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुंबईच्या महापौरांनी हजर असणं आवश्यक होतं. तसंच त्यांनी शहीद अधिकारी संजय राणे आणि महेंद्र देसाई यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन करणंही आवश्यक होतं. यापैंकी काहीच त्यांनी केलं नाही.
चार-चार मंत्री मुंबईतील असूनही त्यांना इकडं का फिरकावसं वाटलं नाही? शिवसेनेच्या एका आमदारालाही मानवंदना देण्यासाठी का यावसं वाटलं नाही? असा सवाल उपस्थित होतोय.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही शहीद जवानांबद्दल कुठं बोलल्याचं आठवत नाही. किमान या शहिद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेणं तर त्यांना नक्कीच शक्य झालं असतं. एरव्ही मुंबईच्या नाईटलाईफबद्दलची चिंता असणाऱ्या आदित्य ठाकरेंनाही शहीद जवानांबद्दल एक ओळीची टीवटीव करावी अशी वाटली नाही.
मराठी माणसांच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्यांना जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त करण्यासाठी वेळ नाही का? असा सूर उटतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.