दहीहंडी उत्सवात बालगोपाळांची उणीव, मंडळं नाराज

सध्या मुंबईत जागोजागी दहीहंडी मंडळे सराव करीत आहेत. परंतु महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने १२ वर्ष खालील मुलांना दहीहंडीत भाग घेण्यावर बंदी घातल्यामुळे  मंडळे नाराज झाली आहेत. काळ्या फिती लावून दहहंडी पथके सराव करीत आहेत.

Updated: Jul 19, 2014, 10:15 PM IST


Caption

मुंबई : सध्या मुंबईत जागोजागी दहीहंडी मंडळे सराव करीत आहेत. परंतु महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने १२ वर्ष खालील मुलांना दहीहंडीत भाग घेण्यावर बंदी घातल्यामुळे  मंडळे नाराज झाली आहेत. काळ्या फिती लावून दहहंडी पथके सराव करीत आहेत.

येत्या १८ ऑगष्ट रोजी दही हंडीचा उत्सव साजरा होणार आहे. दर वर्षी आठ थर, नऊ थर किंवा अगदी दहा मानवी थरांसाठी मंडळा-मंडळात चढाओढ लागत असते. या दहीहंडीच्या वरच्या थरांवर हलक्या वजनाचे म्हणून लहान मुलांना पाठवले जाते. मात्र, लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. हे जाणून बाल हक्क आयोगाने १२ वर्षांखालील मुलांना दही हंडी खेळण्यास बंदी घातली. यामुळे, दही हंडी मंडळांकडून नाराजीचा सूर उमटायला लागला आहे.

दही हंडी मंडळे सुमारे एक ते दीड महिने अगोदर पासून सराव करतात. सर्व गोपाळांना व्यायाम करावा लागतो. फिटनेस असेल तरच हंडीच्या थराला उभा राहू शकतो. सुरक्षितपणे हंडी कशी फोडली जाईल याकडे सर्वांचे लक्ष असते. म्हणूनच सर्व जण हाताची जाळी करून बाजूला उभे असतात. गेली कित्येक वर्षे लहान मुले बिनधास्तपणे  हंडी फोडताना आपण पाहिलंय. 

यंदाच्या दहिहंडी उत्सवात बाळ गोपाळांची धूम आता दिसणार नाही, त्यांची उणीव दहीहंडी पथकाला नक्कीच भासेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.