मोदी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला गडकरींनी

मोदी सरकारला सात महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला.

Updated: Jan 1, 2015, 09:44 PM IST
मोदी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला गडकरींनी title=

मुंबई : मोदी सरकारला सात महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला.

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यामुळं मोठा दिलासा मिळाला असून महागाई शून्य टक्क्यावर आल्याचं त्यांनी सांगितलंय.

यापुढं गॅस सबसिडीसह प्रत्येक सबसिडी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचीही माहिती गडकरींनी दिली. गडकरींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. 

गडकरी पत्रकार परिषद मुद्दे -

  • 18.86 % महागाईचा दर होता, आता शून्य टक्के आला आहे.
  • आजपासून गॅस सुबसीडी खात्यात जमा होणार,
  • पेट्रोल साधार  10 रूपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे
  • भारताचा GDP आता 5.85% झाला आहे
  • प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेप्रमाणे प्रधानमंत्री सिंचन योजना सुरु, 100 टक्के अनुदान देणार
  • महाराष्ट्रत दोन वर्षात पाच लाख सौर पंप देणार
  • नाशिक पालिका सांडपाणी विकते, गंगा प्राधिकरणमध्ये पण हाच फॉर्मूला राबवणार
  • गंगा प्रकल्पाप्रमाणे अरबी समुद्र स्वच्छ करण्याचे अभियान महाराष्ट्र सरकारने घ्यावे
  • प्रधानमंत्री जनधन योजना 10 कोटी लोकांनी खाती उभारली आहेत
  • मंत्री कैबिनेट नोटचा अभ्यास करून येतात ,प्रशासन पण गतिमान झाले आहे
  • राष्ट्रीय महामार्गावर दीड लाख लोक दरवर्षी मरतात,
  • देशात 30 टक्के driving लायसन्स बोगस निघाले आहेत
  • दोन वर्षात 30 किमी प्रति दिन लांबीचे रस्ते बांधू
  • राज्यातील रस्ते बांधणीसाठी स्वस्तात सीमेंट उपलब्ध करून देऊ
  • मुंबई -गोवा हा मार्ग , 4,000 कोटी रुपयांचा, चार लेनचा बांधू
  • एक महिन्यात नवीन टोल धोरण आणणार
  • दर 25- 30 किमीला, 2000 अमेनिटी सेंटर्स, राष्ट्रीय महामार्गावर करणार , स्वच्छतागृह -मॉल- गार्डन करणार
  • पर्यावरण विभागाने चांगले काम केले आहे, राज्यातील 71 प्रकल्प मान्यता दिली
  • राज्यातील राज्य रस्त्यांवर ई टोल सुरु करा, केंद्र सर्व सहकार्य करेल
  • road Transport saftey bill आणत आहोत
  • ई रिक्शा , ई कार्ट आणणार, मुंबईत नाही पण निदान राज्यातील छोट्या गावात,नगरात आणणार
  • मुंबई पुणे बसेस बायोडिझेलवर चालवा अशी सुचना केली आहे,
  • मुंबईत इलेक्ट्रिक बसेस सुरु होउ शकतात
  • मुंबई पाणी - हवा प्रदूषणमुक्त करणार
  • BPT बंद करणार नाही, कोणाला बेरोजगार करणार नाही,passenger सेवा सुरु करणार, एक रुपयांची जमीन builder ला देणार नाही
  • सी प्लेन , howarcraft बनवणार
  • नरीमन पॉइंटला 3 हेलिपैड बनवत आहोत, लवकरच प्रक्रिया सुरु होईल
  • मुंबईत वाटर बस एक - दीड महिन्यात आणु, 3 महीन्यात सुरु करु
  • 70,000 कोटी रुपयांची national रस्ते मार्गाची कामे सुरु केली आहेत
  • गेल्या 10 वर्षात राज्याला जे मिळाले नाही ते 2 वर्षात मिळेल
  • महाराष्ट्र टोलमुक्त करण्याबाबत निवडणुकीत आश्वासन - काय झाले -
  • टोल पॉलिसी बनवत आहोत, PMशी आणि कैबिनेटमध्ये यावर चर्चा करणार आहोत,
  • CM शी बोललो, राज्य आणि केंद्र सरकार काम करत आहे, थोड़ा आम्हाला वेळ द्या
  • गड़करीं -माझ्या गावात दापेवाडीमध्ये 16 तास लोडशेडिंग आहे ,आमचा प्रयत्न आहे की राज्य लोडशेडिंग मुक्त करु
  • पत्रकार डबल ढोलकी आहेत 
  • पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेख़ाली मुंबईसाठी समिति -  CM ची भूमिका - मी 100 टक्के सहमत आहे 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.