www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.
`नोकरी जॉब स्पीक`च्या निर्देशांकांनुसार, एप्रिलमध्ये नोकरीची १९ टक्कांनी वाढ दूरसंचार क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात सर्वात जास्त नोकरीची संधी उपलब्ध झालीय. अशीच नोकरीची वाढ बीपीओ क्षेत्रात १४ टक्के, औषध क्षेत्रात ११ टक्के तर बॅंकिंग आणि फायनान्स क्षेत्रात ४ टक्के आणि वाहन क्षेत्रात ६ टक्के झालीय. मात्र ही टक्केवारी तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात ७ टक्कांनी घसरलीय.
तसेच निर्देशांकात दिल्ली अग्रेसर असून, त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. निर्देशांकाचा टक्का पुण्यात ८ इतका आहे. तर हैदराबाद आणि कोलकाता मध्ये थोडीशी वाढ बघायला मिळतंय. त्यामुळे लवकरच सर्वच क्षेत्रात नव्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती नक्कीच सुधारेल, असा विश्वास इन्फो एज इंडिया लिमिटेड`चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश ओबेरॉय यांनी व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.