'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

वाहन चालवताना वाहन चालकाला अल्प प्रमाणात दारु सेवनाची तरी सूट का दिली जातेय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

Updated: Jan 8, 2016, 11:05 AM IST
'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'! title=

मुंबई : वाहन चालवताना वाहन चालकाला अल्प प्रमाणात दारु सेवनाची तरी सूट का दिली जातेय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

दारु पिऊन  वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांची संख्या पहाता सरकारने 'झिरो टॉलरन्स' पॉलिसीचा अवलंब करावा, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिलाय. 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणी सरकारने कडक धोरण अवलंबल  पाहिजे, असं मत उच्च न्यायालयानं नोंदवलंय. 

अभिनेता सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हे मत नोंदवलंय.

वाहन चालवताना वाहन चालकाला कोणत्याही परिस्थितीत दारु पिण्याची परवानगी देण्यात येवू नये तसेच वाहनचालकांने किती प्रमाणात दारु प्यायली आहे? हे सिद्ध करण्याचा दबाव पोलिसांवर का असावा? असाही सवाल उच्च न्यायालयाने केला आहे.