नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेसाठी निवडणूक तारखा जाहीर

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक जाहीर झालीय. २२ एप्रिलला दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ एप्रिलला मतमोजणी होईल. आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केली.

Updated: Mar 23, 2015, 11:26 PM IST
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेसाठी निवडणूक तारखा जाहीर title=

मुंबई: नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक जाहीर झालीय. २२ एप्रिलला दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ एप्रिलला मतमोजणी होईल. आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केली.

 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या १११, तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या ११३ पदांसाठी ही निवडणूक होत आहे.
 
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम
 

 - निवडणूक नोटीस प्रसिद्ध : ३१ मार्च २०१५
 
- उमेदवारी अर्ज देणं आणि स्वीकारणं : ३१ मार्च ते ७ एप्रिल २०१५
 
- उमेदवारी अर्जांची छाननी : ८ एप्रिल २०१५
 
- उमेदवारी अर्ज मागे घेणं : १० एप्रिल २०१५
 
- निवडणूक चिन्हांचं वाटप : ११ एप्रिल २०१५
 
- मतदान दिनांक : २२ एप्रिल २०१५
 
- मतमोजणी दिनांक : २३ एप्रिल २०१५

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.