रमजान ईदचा सर्वत्र उत्साह

ईदचा चाँद काल नजरेला पडलाय. त्यामुळं आज देशभरात सर्वत्र रमजान ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांनी तशी घोषणा केलीय.

Updated: Jul 29, 2014, 07:39 AM IST
रमजान ईदचा सर्वत्र उत्साह title=

मुंबई : ईदचा चाँद काल नजरेला पडलाय. त्यामुळं आज देशभरात सर्वत्र रमजान ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांनी तशी घोषणा केलीय.

रमझान या पवित्र महिन्याचा शेवट ईदचा सण साजरा करून होतो. मुंबईमध्येही आज ईद साजरी होणार आहे. ईदच्या निमित्तानं मोहम्मद अली रोड येथील मिनारा मस्जिद, क्रॉफर्ड मार्केट येथील जुमा मस्जिद आणि अंजुमन-इ-इस्लाम इथं खास नमाज पढला जाणार आहे. ईदच्या निमित्तानं मुस्लिमबहुल भागातील बाजारपेठा सजल्या असून, नवीन कपडे आणि वस्तू खरेदीसाठी रात्रीपासूनच झुंबड उडालीय. 

शिवाय शिरकुर्मा, फिरनी, मालपुवा, मावा जलेबी, रबडी, फालूदा अशा गोडधोड पदार्थांची रेलचेल असणार आहे... ईदच्या या आनंदी पर्वात तुम्हालाही ईदच्या भरपूर शुभेच्छा.

ईदसाठी मोठया उत्साहात खरेदी सुरु आहे. जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये खरेदीचा आनंद घेतला जातोय. ईदसाठी खास तयार करण्यात आलेली मिठाई नवे कपडे यांची उत्साहात खरेदी सुरु आहे. जम्मू काश्मिरातील वातावरण गेल्या काही वर्षात निवळल्यानं नागरिक ईदसाठी मोकळेपणानं खरेदी करत आहेत. ईदची तयारी मोठया उत्साहात होतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.