मुंबई : मुंबईच्या पीव्हीआर सिनेमागृहात राष्ट्रगीताचा अपमान प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले आहे. हॉलमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबाने माफी मागितली आहे.
मुस्लिम कुटुंबाच्या दृष्टीने या प्रकरणाला वाढविण्याची इच्छा नाही. मला वाटते की माझ्याकडून चूक झाली आहे. मी चित्रपट पाहण्याच्या मूडमध्ये गेलो होतो आणि अचानक हे सर्व काही घडले. आता मला याची जाणीव होत आहे. आता मी या प्रकरणात काही म्हणू इच्छित नाही.
आता भविष्यात लक्षात ठेवणार की असे माझ्याकडून काही होणार नाही. पण कुटुंबासोबत इतरांनी केलेल्या वागणुकीबद्दल दुःख वाटल्याचेही या कुटुंबातील एकाने सांगितले आहे. माझ्यासोबत माझी पत्नी होती, तिला सार्वजनिक ठिकाणी अपमानीत करणे योग्य नव्हते असेही त्याने म्हटले आहे.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रगीतावेळी मुस्लिम कुटुंब उभे राहिले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपस्थितांनी आक्षेप घेतला आणि त्यांना चित्रपटगृहातून बाहेर जावे लागले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.