पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग

आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

Updated: Sep 20, 2016, 09:17 PM IST
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग title=

मुंबई : आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका मालती पाटील, मनसे नगरसेविका रुचिता मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लछमन टिकमानी, बसपा नगरसेविका सुशीला यादव आणि दशरथ यादव यांचा समावेश आहे. काँग्रेसचे रमाकांत पाटील आणि मनसेचे राजेश मोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एकीकडे भाजपदेखील ठाण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या कोणत्याही खेळीआधी हे पाच नगरसेवक गळाला लावून शिवसेना ठाण्यात आपलाच वरचष्मा कायम राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.