मुंबईकर सण्डेनंतर `मोनो डार्लिंग`ला विसरले

मुंबईकरांनी संडे पाहून मोनोडार्लिंगची भेट घेतली, वेळआधी जाऊन मोनोडार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. मोनोडार्लिंगला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.

Updated: Feb 3, 2014, 03:38 PM IST

www.24taas.com, जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांनी संडे पाहून 'मोनो डार्लिंग'ची भेट घेतली, वेळेआधी जाऊन मोनो डार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. 'मोनो डार्लिंग'ला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.
नेहमीच्या लोकलचा कंटाळवाणा प्रवास विसरण्याचा थोडासा का होईना प्रयत्न मुंबईकरांनी केला, म्हणजे रविवारी भरभरून प्रेम, सोमवारी ब्रेकअप, पुन्हा येत्या शनिवारपासून पॅचअपचा प्रयत्न.
कारण रविवारी गर्लफ्रेन्डला भेटल्यानंतर कामाच्या धबाडग्यात सोमवारी पुन्हा विसर. त्याप्रमाणे आज न्यूज पेपरच्या हेडलाइन्सच्या चित्रात मोनोला आठवलं, आणि मुंबईकर कामावर निघून गेले.
कारण रविवारी मोनोचं जेवढं आकर्षण मुंबईकरांना होतं, तेवढं सोमवारी सकाळीपर्यंत तरी दिसून आलेलं नाही. मुंबईकर कामाच्या घाईगडबडीत 'मोनोडार्लिंग'ला विसरले हेच खरं.
नवीनच मुंबईत दाखल झालेल्या मोनोला मुंबईकरांचं `ब्रेकअप-पॅचअप`च हे लव्ह पॉलेटीक्स अजून कसं कळणार?, उशीर केल्याशिवाय आणि वाट पाहू दिल्याशिवाय, या मुंबईकराला आपल्या सेवेची किंमत कळणारच नाही, हे मोनोला समजायला आणखी उशीर लागेल.
शुकशुकाटाचं दूसरं कारण न्यूज पेपर्समध्ये मोनोरेलवर पहिल्याच दिवशी गर्दी असल्याचं छापून आलं.
मोनोला मुंबईकर आणि मुंबईकरांना मोनो अजून नवीन आहे. मात्र मुंबईकरांना रोजच नवनवीन माणसं आणि गोष्टींचा सामना करावा लागतो.
मुंबईकर 'पहेला नशा पहेला खुमार' हे गाणं जेवढ्या प्रेमाने म्हणतात, तेवढंच 'लंबी जुदाई'. हे नव्या मोनोडार्लिंगला कळायला आणखी थो़डा वेळ लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.