विद्यापीठाचं सर्व्हर अडकलं... विद्यार्थी लटकले!

एकिकडे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी झटत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रक्रीयेनं चांगलच लटकवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 5, 2013, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकिकडे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी झटत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रक्रीयेनं चांगलच लटकवलंय. सोमवारपासून विद्यापीठाची वेबसाइट सर्वर स्लो झाला असून विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईत डिग्री कॉलेजच्या ऑनलाइन प्रवेशामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या डिग्री कॉलेजसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालीय. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बीएमएम आणि बीएमएस अशा कोर्सेससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे. २००९ साली अपयशी ठरलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाच यंदा विद्यापीठानं राबवलीय. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून वेबसाईट अत्यंत धिम्या गतीनं सुरु आहे. त्यातच सोमवार आणि मंगळवारी वेबसाईट डाऊन होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी येताय आहेत.
विद्यापीठाकडून सर्व्हरची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. गरज पडल्यास प्रवेशाची मुदतही वाढवण्यात येईल, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलंय.

चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘कट ऑफ लिस्ट’सोबत टक्यांचं गणित जुळवत असतानाच, प्रवेश प्रक्रियेतल्या वेबसाईटच्या या घोळांचाही सामना त्यांना करावा लागतोय. परिणामी विद्यार्थ्यांचा सगळा वेळ तांत्रिक अडचणी दूर करण्यातच जातोय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.