मुंबई असुरक्षित? मध्यरात्री दोन चोरीच्या घटना

मुंबईच्या जोगेश्वरीत तब्बल १० किलो सोनं चोरी झाल्याची घटना समोर आलीय. जोगेश्वरीच्या अंबिका ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली असून चोरी गेलेल्या सोन्याची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे. या दुकानात काम करत असलेल्या नोकरानंच ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तो सध्या फरार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 10, 2013, 08:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या जोगेश्वरीत तब्बल १० किलो सोनं चोरी झाल्याची घटना समोर आलीय. जोगेश्वरीच्या अंबिका ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली असून चोरी गेलेल्या सोन्याची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे. या दुकानात काम करत असलेल्या नोकरानंच ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तो सध्या फरार आहे.
तर मुंबईच्याच चर्चगेट स्टेशनच्या समोरही एटीएम फोडीची घटना घडलीय. रात्री स्टेशनच्या समोरील सीटी बणकेच्या एटीएममध्ये एक जण शिरला आणि त्यानं चक्क एटीएम मशीनच तोडण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे या एटीएम सेंटरमध्ये सिक्यूरिटी गार्डच नव्हता.
आजूबाजूच्या लोकांना तोडफोडीचा आवाज आला असता त्यांनी कंट्रोल रुमला फोन करुन त्याबद्दल माहिती दिली. पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या दोन्ही घटनांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबापुरीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.