मुंबई अँटॉप हिलमध्ये चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक

 अँटॉप हिलमधल्या लहानगीवर बलात्कार करणारा अखेर गजाआड. १० दिवसांच्या अविरत तपासाअंती आरोपीला केली अटक. मध्य मु्ंबईतल्या अँटॉप हिल भागात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर गजाआड केलंय.

Updated: May 2, 2015, 09:37 AM IST
मुंबई अँटॉप हिलमध्ये चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक title=

मुंबई : अँटॉप हिलमधल्या लहानगीवर बलात्कार करणारा अखेर गजाआड. १० दिवसांच्या अविरत तपासाअंती आरोपीला केली अटक. मध्य मु्ंबईतल्या अँटॉप हिल भागात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर गजाआड केलंय.

मोहम्मद रियाझ महेफुझ अली अन्सारी असं या आरोपीचं नाव आहे. तो दक्षिण मुंबईतल्या ताडदेव इथे राहतो आणि कपड्याच्या कारखान्यात काम करतो. २० एप्रिलला त्यानं हे दुष्कृत्य केलं होतं. १० दिवस तो पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याचं रेखाचित्र प्रकाशित केलं होतं.

तसंच त्याच्या नावावर पंचवीस हजारांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. वडाळा पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयानं त्याला सहा मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.