अंडरवर्ल्डची खैर नाही, मारियांनी थोपटले दंड

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्या वाढत्या कारवाया लक्षात घेत मुंबई पोलीसांनी रवी पुजारी विरोधात दंड थोपटले असून, या अंडरवर्ल्ड गँगचा खात्मा करण्याचे मुंबई पोलीसांनी ठरवलं आहे.

Updated: Sep 10, 2014, 06:32 PM IST
अंडरवर्ल्डची खैर नाही, मारियांनी थोपटले दंड title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्या वाढत्या कारवाया लक्षात घेत मुंबई पोलीसांनी रवी पुजारी विरोधात दंड थोपटले असून, या अंडरवर्ल्ड गँगचा खात्मा करण्याचे मुंबई पोलीसांनी ठरवलं आहे.

त्याचाच एक भाग म्हणून रवी पुजारी गँगशी संबंधीत होते ते आणि सध्या संबंधीत आहेत अशा सर्व रवी पुजारी गँगच्या गुंडाची धरपकड करण्याचे  आदेश मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी दिले आहेत.

तसेच  इतर अंडरवर्ल्ड गँगच्या एक्टीव्ह मेंबर्सना ही ताब्यात घेण्याचे आदेश राकेश मारीया यांनी दिलेत. यानुसार मुंबई पोलीसांनी पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड गँगचा खातमा करण्या़चे शिव धनुष्य उचलले आहे. याकरता मुंबई पोलीस सक्रीय झाली असून संबंधीत गँगस्टर विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

रवी पुजारी यांनं एका इंग्लीश वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला दिलेल्या धमकीनंतर अंडरवर्ल्डची धमकी आलेल्या पत्रकारांना पोलीस सुरक्षेसह गाड़ी देणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी सांगितलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.