मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर

मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या पदभार स्वीकारणार आहेत. 

Updated: Jan 29, 2016, 05:23 PM IST
मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर title=

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या पदभार स्वीकारणार आहेत. 

दत्ता पडसलगीकर सध्या आयबीमध्ये कार्यरत आहेत. उद्या ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पडसलगीकर हे आयबीमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. सध्या ते आयबीमधअये अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. मुंबईचे आयुक्त अहमद जावेद यांचा कार्यकाळ संपला आहे. अहमद जावेद सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून रूजू होत आहेत. 

पडसलगीकर हे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कनेक्ट असलेले अधिकारी अशी पडसलगीकर यांची ख्याती आहे. 

विविध एबसीमध्येही त्यांनी याआधी काम केलंय. त्यामुळे मुंबईसमोरची बदलती आव्हानं, आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं बदललेलं स्वरूप लक्षात घेता पडसलगीकर यांच्यासारख्या अधिका-यांची इथे नियुक्ती होणं उपयुक्त ठरू शकतं.