मुंबई : नव्या महापौर निवासस्थानासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची पसंती राणीच्या बागेतल्या बंगल्याऐवजी मलबार हिल इथल्या अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्याला आहे. आयुक्तांना पत्र लिहून मलबार हिल इथला बंगला महापौर निवासस्थानासाठी देण्याची मागणी महापौरांनी केलीय.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबरोबरच आता महापौरांचं निवासस्थानही मलबार हिलवर हलण्याची यामुळे शक्यता निर्माण झालीय. राणीची बाग परिसर हा शांतता क्षेत्र असल्याने तिथं विविध कार्यक्रम करण्यावर निर्बंध येणार असल्याने ती जागा महापौरांना अमान्य आहे. तसंच राणीच्या बागेतला बंगला छोटा असल्याने तिथे गैरसोय होणार असल्याचं महापौरांचं मत आहे.
असा आहे अतिरिक्त आयुक्तांचा बंगला