मोदींची तुलना हिटलरशी; महापौर आंबेकर पुन्हा वादात

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत. 

Updated: Jul 21, 2015, 06:44 PM IST
मोदींची तुलना हिटलरशी; महापौर आंबेकर पुन्हा वादात title=

मुंबई : मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत. 

'नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा मी एक व्यक्ती म्हणून आदर करते, स्वत:च्या क्षमतेवर त्यांना प्रचंड विश्वास आहे. मात्र कधीकधी त्यांचे शासन मला हिटलरशाहीसारखं वाटतं. जेव्हा एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता एकवटली जाते तेव्हा असं होणं स्वाभाविकच आहे' असं म्हणत स्नेहल आंबेकर यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली होती.

त्यानंतर आज भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर निदर्शनं केली. भाजप नगरसेवकांनी महापौरांचा निषेध केला. महापौरांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना भाजपमधला तणाव आणखी वाढलाय. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या पंतप्रधान मोदींबाबतच्या विधानाचे पडसाद आज विधीमंडळात उमटले.

मोदींना हिटलर म्हणणं हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारनं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत केली. 

त्यावर शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी या आरोपाचं खंडन केलं. महापौरांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय, असं गोऱ्हे यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.