मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. त्यामुळे भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.
थेट कायद्याला आव्हान दिल्याने, अशा पद्धतीने याचिका मागे घेवू शकत नाही. याकरिता ठोस कारण द्यावे लागेल तेव्हाच ही याचिका मागे घेता येईल, असे न्यायालयाने छगन भुजबळांना सुनावले आहे. या याचिकेवर १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.