अरूप पटनायक यांची उचलबांगडी

मुंबई हिंसाचारप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुकत यांची अरूप पटनायक यांची उचलबांगडी राज्य सरकराने केली आहे. त्यांना बढती देताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या महासंचालक पदाचा चार्ज देण्यात आला आहे. झी २४ तासने अरूप पटनायक यांच्या बदलीचे सर्वप्रथम वृत्त दिले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2012, 08:13 AM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबई हिंसाचारप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुकत यांची अरूप पटनायक यांची उचलबांगडी राज्य सरकराने केली आहे. त्यांना बढती देताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या महासंचालक पदाचा चार्ज देण्यात आला आहे. झी २४ तासने अरूप पटनायक यांच्या बदलीचे सर्वप्रथम वृत्त दिले होते.
मुंबई आयुक्तपदी सत्यपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरूप पटनायक यांच्या राजीनाम्याची केली होती. हिंसाचार प्रकरणी मनसेने भव्य मोर्चाही काढला होता. त्यावेळी पुन्हा पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे मुंबई हिंसाचार प्रकरण पटनायक यांनी भोवल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव गृहखात्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. तीन दिवसांपासून तो मुख्यमंत्र्याकंड पडून होता. त्यावर मुख्यमंत्र्यानी आज निर्णय घेतला. सीएसटी हिंसाचारावरुन पटनायक यांच्यावर राजकीय पक्षांकडून टीका होत होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गिरगावपासून आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाविरोधात कारवाई होणार आहे. पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकरली असतानाही राज ठाकरेंनी मोर्चा काढला त्यामुळं कायद्याचा भंग झाल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी अरूप पटनाईक आणि आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.