www.24taas.com, मुंबई
उद्योगपती आणि रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजूर केला आहे. त्यामुळे अंबानी यांनी आता खास सुरक्षा मिळणार आहे.
मुकेश अंबानी यांना नुकतेच एक धमकीचे निनावी पत्र आले होते. त्यामुळे अंबानी यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन ही सुरक्षा पुरविण्यात येत आहे. ‘झेड’ दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत अंबानी हे मुंबई आणि शहराबाहेर फिरत असताना २४ तास त्यांच्याभोवती सीआरपीएफचे कमांडो असतील.
सीआरपीएफच्या उत्तर प्रदेश बटालियनमधून २८ जवानांची वेगळी टीम अंबानींच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे.
कोणत्याही सरकारी पदावर नसलेल्या एका उद्योगपतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांना पहिल्यांदाच पार पाडावी लागणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या वाहनापुढे कमांडोंचे एक पायलट वाहन असेल आणि एक सशस्त्र कमांडोंचे पथक मागे राहणार आहे.