www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदा म्हाडाच्या 1244 घरांची सोडत होणार आहे. यामध्ये उच्च उत्पन्न गटासाठी 572, अल्प उत्पन्न गटासाठी 96, अत्यअल्प उत्पन्न गटासाठी 222 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 354 घरांची सोडत आहे. म्हाडाच्या लॉटरी प्रक्रिया सुरु झालीय.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १२४४ घरांच्या लॉटरीचा निकाल आज लागला आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येतो आहे. सकाळी १० ते १ आणि दुपारी २ ते संध्याकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहिर होईल. या लॉटरीमध्ये घरं जिंकणा-यांचे म्हाडाकडून बँड वाजवत स्वागत करण्यात येणार आहे... गेल्या ५ वर्षात सर्वात कमी प्रतिसाद यंदाच्या लॉटरीला मिळालाय. फक्त ८७ हजार ६४६ अर्ज दाखल झालेयत.
सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणा-या वाढलेल्या किमतींमुळे म्हाडाच्या घरांबाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली होती. या घरांच्या किंमतीवरुन राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री असा संर्घषही पाहायला मिळाल होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस य़ंदा मोडलेत. या घरांच्या किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत. मालवणी इथल्या अत्यल्प गटासाठी फक्त 180 चौरस फुटांच्या घराची किंमत 7 लाख 8 हजार आहे. तर पवईजळच्या तुंगा इथल्या उच्च उत्पन्न गटाच्या 476 चौरस फुटाच्या घराची किंमत ही सगळ्यात जास्त आहे. तब्बल 75 लाख 22 हजार इतकी पवईतल्या घरांची किंमत आहे.
म्हाडाचे सगळ्यात मोठं घर गोराई रोडमध्ये उच्च उत्पन्न गटासाठींचं आहे. 740 चौरस फुटांचं हे घर आहे. या घराची किंमत 66 लाख रुपयांच्या घरात आहे. तर मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमतीही या 43 ते 52 लाख रुपयांच्या घरांत आहे.
http://mhada.maharashtra.gov.in/ म्हाडाच्या घराबाबत जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.