आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका

भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका दिला आहे.

Updated: Dec 31, 2016, 01:04 PM IST
आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका title=

दीपक भातुसे, मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका दिला आहे.

 मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयांचा झपाटा लावला आहे. आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी  शिवसेनेला दणका दिला. शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय.

याशिवाय दहिसर कारशेड आणि बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचाही निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. हे निर्णय घेऊन शिवस्मारकावरून आधीच दुखावलेल्या शिवसेनेला  मुख्यमंत्र्यांनी आणखी डिवचल्याचं बोललं जात आहे. आरे कारडेपो विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते.. आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलंय.. 

ठळकबाबी... 

- आरे मेट्रो कारशेड उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
- शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांचा निर्णय
- शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा झटका
- आरेमधील 33 हेक्टर जागेवर होणार मेट्रो कारशेड
- समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय
- कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने निर्णय
- आरेमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त वृक्षतोड वाचवून आणि तोडलेल्या झाडांच्या एकास तीन  झाडे लावून कारडेपो मंजूर करण्याची समितीने केली होती शिफारस 
-दहिसर कारशेड आणि बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचाही निर्णय
- प्रदीर्घ काळ रखडलेले बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या प्रस्तावालाही मंजुरी
-बीडीडी वासियांना किमान 500 चौरस फुटाचे घर मिळणार
-दक्षिण मुंबईतील वरळी, नायगाव, शिवडी, एनएम जोशी मार्ग भागात आहेत बीडीडी चाळी
- यातून 61 लाख चौरस फूट अतिरिक्त जागा हौसिंग स्टॉकसाठी सरकारला उपलब्ध होणार
- उपनगरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचाही मार्ग मोकळा
- मुख्यमंत्र्यांकडून पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर
- 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी जादा एफएसआय देणार
 

मुख्यमंत्र्यांनी आणखी डिवचले

- शिवस्मारकावरून आधीच दुखावलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी आणखी डिवचले
- आरे कारडेपोचा निर्णय शिवसेनेला विश्वासात न घेता
- आरे कारडेपो विरोधात शिवसेनेने केले होते आंदोलन
- आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष

शिवसेनेचा आरे  प्रकल्पाला विरोध का?

मेट्रो प्रकल्प तीनसाठी आरेमध्ये कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे. प्रामुख्याने येथील निसर्गावर घाला घातला जाणार आहे. वृक्षतोड होत असल्याने शिवसेनेने प्रामुख्याने विरोध केला आहे. येथील बहुतांश वृक्षांची तोड करुण येथे मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. त्यामुळे निसर्गवाचविण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे.