रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

ही बातमी आहे मुंबईकरांच्या कामाची. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे. मध्ये रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरही आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 

Updated: Dec 25, 2016, 10:08 AM IST
रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक title=

मुंबई : ही बातमी आहे मुंबईकरांच्या कामाची. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे. मध्ये रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरही आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 

मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर मार्गावर नेरूळ ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. मुख्य मार्गावर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांपासून ते 4 वाजून 45 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार. यासाठी कल्याण ते ठाणे दरम्यानची जलद मार्गावरची वाहतूक धिम्या मार्गावरून असेल.

ब्लॉकमुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चलचलवण्यात येणारय. नेरूळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर 11 वाजून 20 मिनिटांपासून ते 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत दुरूस्तीची कामं असती. ट्रान्स हार्बर मार्गावर 11 वजून 4 मिनिटांपासून ते 4 वाजून 4 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल.

तर पनवेल अंधेरी वाहतूक आज बंद राहणारय.  तर इकडे पश्चिम मार्गावर अंधेरी ते बोरिवलीदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय. सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपासून ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंतच ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्यात.