मुंबई : महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची अखेर पोलीस उपअधिक्षक पदावर निय़ुक्ती झालीय. 2015 महाराष्ट्र केसरी चौधरी गेले काही महिने क्रीडा क्षेत्रातून नोकरीसाठी प्रयत्न करत होते.
विजय चौधरी हे मूळचे जळगांव जिल्ह्यातील आहेत. विजय चौधरीला मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले आह. प्रशिक्षणानंतर विजय चौधरी सेवेत दाखल होणार आहेत.
राज्याच्या तुलनेपेक्षा उत्तर प्रदेशात कुस्तीपटूंना जास्त सुविधा मिळतात म्हणून ते राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करतात. आपल्याकडेही तात्काळ नोकरी आणि इतर सुविधा मिळाल्यास राज्यातील मल्ल चांगली कामगिरी करु शकतील अशा शब्दात विजय चौधरीने झी मिडीयाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.