मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो दलित बांधव दादरच्या चैत्यभूमीवर लोटले आहेत. महामहानवास वंदन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, चैत्यभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जणू जनसागरच दादरच्या चैत्यभूमीवर लोटलाय. बाबासाहेबांना स्मरण करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येत दलित बांधव एकत्र आले आहेत. यासाठी चैत्यभूमीवर मोठी तयारी करण्यात आलीय. सुरक्षा, सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून मोठा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
राज्यभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महापालिका आणि सामाजिक संस्थेच्यावतीने वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी आणि मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या अनुयायांना दादर चैत्यभूमी येथे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.