मंत्रालयात लॉकी रॅनसम हल्ला, १५० संगणाकात व्हायरस घुसखोरी

मंत्रालयातील संगणकांवर व्हायरसचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या १० दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Updated: May 25, 2016, 05:14 PM IST
मंत्रालयात लॉकी रॅनसम हल्ला, १५० संगणाकात व्हायरस घुसखोरी title=

मुंबई : मंत्रालयातील संगणकांवर व्हायरसचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या १० दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

मंत्रालयाच्या संगणकांना बाधित करणाऱ्या व्हायरसचं नाव लॉकी रॅनसम असे आहे. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातल्या १५० संगणकांवर या व्हायरसचा हल्ला झाला आहे.
 
दरम्यान सगळ्या फाईल्सचा बॅक अप असल्याने कुठलही मोठं नुकसान झालेलं नाही. पण इतकी मोठी यंत्रणा चालवताना असे व्हायरस रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा नाही का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलाय. 

खबरदारीचा उपाय म्हणून ई-मेल सेवा बंद करण्यात आली आहे. आयटी विभागातले तज्ज्ञ सध्या व्हायरस हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.