मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असतांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची अंमलबजावणी करताना राज्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
राष्ट्रीय-राज्य महामार्गालगत 500 मीटर अंतरावलील सर्व प्रकारची दारू विक्रीची दुकानं बंद करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याची अंमलबजावणी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रासह सर्व संबंधित राज्यांना करायची आहे.
या निर्णयामुळे महामार्गावरील 12 हजार मद्यविक्री दुकानं बंद होणार असल्यानं राज्याचे 7 हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे..
'महामार्गावरील दारूची दुकानं बंद करा'
सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश
12 हजार मद्यविक्री दुकानं बंद होणार
राज्याचं 7 हजार कोटींचं नुकसान होणार
31 मार्चपर्यंत करावी लागणार अंमलबजावणी