बोरीवलीत इमारतीत बिबट्या शिरला...थरार सीसीटीव्हीत

मुंबईच्या बोरीवलीत अभिनवनगरमधील बुधवारी रात्री एका इमारतीत बिबट्या शिरला. इमारतीच्या प्रवेशद्वारावर बंदीस्त कुत्र्याच्या शिकारी करता हा बिबट्या आला होता.

Updated: Jun 25, 2015, 08:40 PM IST
बोरीवलीत इमारतीत बिबट्या शिरला...थरार सीसीटीव्हीत title=

मुंबई : मुंबईच्या बोरीवलीत अभिनवनगरमधील बुधवारी रात्री एका इमारतीत बिबट्या शिरला. इमारतीच्या प्रवेशद्वारावर बंदीस्त कुत्र्याच्या शिकारी करता हा बिबट्या आला होता.

हळू हळू निरीक्षण करत हा बिबट्या इमारतीच्या गेटवर पोहोचतो आणि कुत्र्याची शिकार करण्याकरिता धडपड करु लागतो. पण, इमारतीचा कुत्रा लोखंडी गेटच्या आत होता. तरीही बिबट्याने त्या कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. 

धडपड पाहून लोखंडी गेटच्या आत असलेल्या कुत्र्याचीही पळापळ झाली. पण, शेवटी लोखंडी गेटच्या आत आहोत आणि बिबट्या आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही हे लक्षात आल्यावर. कुत्र्याने जोरात भूंकायला सुरुवात केली. आणि इमारतीच्या लोकांना जागे करण्याचा प्रयत्न केला.

कुत्र्यांच्या भूंकण्याने इमारत आणि आजूबाजूच्या लोकांना जाग येईल हे बिबट्याच्या लक्षात आल्यावर बिबट्याने त्या सोसायटीतून शिकार न करताच धूम ठोकली. हा सर्व प्रकार इमारतीत बसवलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.