भूसंपादन विधेयक : टीका योग्य नाही - भाजप, सेनेचे भाजपला प्रत्युत्तर

भूसंपादन विधेयकावरून भाजप-शिवसेनेत वाद कायम आहेत. सत्तेत राहून विरोध अयोग्य असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर केली. तर शिवसेनेचा  भूसंपादनाला नव्हे तर त्यातल्या जाचक अटींना विरोध असल्याचं प्रत्त्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले.

Updated: Mar 4, 2015, 06:18 PM IST
भूसंपादन विधेयक : टीका योग्य नाही - भाजप,  सेनेचे भाजपला प्रत्युत्तर title=

मुंबई : भूसंपादन विधेयकावरून भाजप-शिवसेनेत वाद कायम आहेत. सत्तेत राहून विरोध अयोग्य असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर केली. तर शिवसेनेचा  भूसंपादनाला नव्हे तर त्यातल्या जाचक अटींना विरोध असल्याचं प्रत्त्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले.

शिवसेना आणि भाजपमधील वाद संपायचे नाव घेत नाही. कोणत्याना कोणत्यातरी मुद्यावर तू तू मै मै सुरुच आहे. आधी मंत्र्यांना पूर्ण अधिकार मिळत नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा वाद मीडियापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. सेनेची रिनंतर भाजपच्या मंत्र्यांनीही ओढली. शिवसेनेचे मंत्री आम्हाला अधिकार देत नाही, असे भाजपचे राज्यमंत्र्यांनी सांगत वादात अधिक भर घातली. त्यानंतर सत्तेतून बाहेर पडा आणि आरोप करा, असा थेट हल्लाबोल भाजपने केला. त्यामुळे शिवसेना अधिकच आक्रमक झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलन पुकारले. त्यामुळे वाद अधिकच चिघळला. त्यानंतर समन्वय समिती स्थापन कऱण्यात आली. पहिली बैठकीत केवळ चहापाणीच झाले. त्यामुळे वादावर तोडगा निघाला नाही.

केंद्रातील भाजप सरकारच्या भूमी अधिग्रहन विधेयकाचा मुद्दा उचलून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले. त्यामुळे भाजप-शिवसेनेत पुन्हा वादाला नव्याने तोंड फुटले. यावर भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला चिमटा काढला. त्यानंतर सेनेने प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचा विधेयकाला आंधळा विरोध नाही आणि आंधळा पाठिंबाही  नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.. विधेयकातल्या जाचकतेबाबत पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.