ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ यांच्यासोबत, कृष्णा बोरकर यांनी काम केलं होतं. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 15, 2017, 11:18 PM IST
 ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन  title=

मुंबई : ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ यांच्यासोबत, कृष्णा बोरकर यांनी काम केलं होतं. 

पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित पृथ्वी गोल आहे, हे बोरकर यांचं स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिलं व्यावसायिक नाटक होतं. रणांगण नाटकातले १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा करण्याचं आव्हान कृष्णा बोरकर यांनी लीलया पेललं होतं. 

बाबुराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मधुकर तोरडमल, डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि इतरही मातब्बर कलाकारांची रंगभूषा बोरकर यांनी केली होती. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना राष्ट्रपतींहस्ते गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र सरकार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्यासह इतरही विविध संस्थांतर्फे त्यांचा सन्मान केला गेला होता. कृष्णा बोरकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे.