मुंबईतील मुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण

मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणा-या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 4, 2013, 04:06 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणा-या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय कामकाजाला सुरुवात झालीये. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केलाय. यावेळी ही माहिती दिली.
यंदाच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्ये म्हणजे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.
मुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर मुंबई महापालिकेची वादग्रस्त सुगंधी दूध योजना सुरुच राहणार आहे. ही योजना विषबाधेमुळं वादात सापडली होती.