संयम राखा, कायदेशीर लढाई लढू : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काही क्षणात विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Updated: Feb 10, 2016, 08:01 AM IST
संयम राखा, कायदेशीर लढाई लढू : छगन भुजबळ title=

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काही क्षणात विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मी कायदेशीर लढाई लढणार आहे. मी काहीही चूक केलेली नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भुजबळ यांच्यापाठिमागे ईडीचा ससेमीरा लागल्यामुळं त्यांच्या समर्थकांनी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी विमानतळावर गर्दी केलीय. भुजबळांच्या समर्थनात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी नाशिक, नांदगाव आणि येवल्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. तर पुण्यातून समता परिषदेचे कार्यकर्ते विमानतळावर जमलेत.

 

यावेळी भुजबऴांच्या समर्थनात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तुम्ही शांत राहा. मी कायदेशीर लढाई लढणार आहे. तुम्ही कोणताही गोंधळ घालू नका, तुमचा जसा पाठिंबा आहे. तसाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेही मला आशीर्वाद आहेत. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, असे भुजबळ म्हणालेत.

 

दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ आता छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांचीही ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. मुंबईतल्य़ा कार्यालयात त्यांची गेल्या तीन तासांपासून चौकशी सुरू होती. ईडीच्या कार्यालयाबोहर पंकज भुजबळ यांचे समर्थक जमलेले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वीच माजी खासदार समीर भुजबळ यांचा आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीतला मुक्का लांबलाय.

कोर्टानं त्यांना कालच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलीय. त्यामुळं आता पंकज भुजबळ यांनाही अधिकच्या चौकशीसाठी अटक होणार की त्यांना आज चौकशी करून सोडून देण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.