मुंबई : 'आपल्या जीवाला सनातन संस्थेपासून धोका आहे असं सांगणाऱ्या निखिल वागलेंचा सहानुभूती मिळवण्यासाठी हा एक पब्लिसिटी स्टंट आहे' असं सनातन संस्थेनं म्हटलंय.
गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आता पत्रकार निखिल वागळे असल्याचा दावा करण्यात येत होता. यावर, सनातन संस्थेचे पदाधिकारी विरेंद्र मराठे यांनी 'पीटीआय'शी बोलताना हा दावा फेटाळून लावलाय.
अधिक वाचा - कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे?
'वागळे यांनी सनातनविरुद्ध अनेकदा लिहिलंय... तुम्ही त्यांचं ट्विटर अकाऊंट पाहिलंत तर ते सनातनचा उल्लेख नेहमी दहशतवादी संघटना म्हणूनच करतात... आम्हीही त्यांच्याकडे दूर्लक्ष केलंय... आम्ही त्यांना कोणतीही धमकी दिलेली नाही' असं मराठे यांनी म्हटलंय.
सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला अटक झाल्यानंतर 'सनातन संस्था' पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
सनातनचा आणखी एक कार्यकर्ता रुद्र पाटील याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचाही पानसरे हत्या प्रकरणात हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. यावर बोलताना 'रुद्र पाटील 2009 सालापासून सनातनच्या संपर्कात नसल्याचं' स्पष्टीकरण सनातन संस्थेनं दिलंय. रुद्र पाटीलचा 2009 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.