इक्बालकडून एजंटला कानातून रक्त येईपर्यंत मारहाण

दाऊदचा भाऊ एकबाल कासकरने इस्टेट एजंटला खंडणीसाठी कानातून रक्त येईपर्यंत बडवल्याचं समोर आलंय. तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी मोहम्मद सलीम अब्दुल जब्बार शेख या इस्टेट एजंटला कानातून रक्त येईपर्यंत बडवले. 

Updated: Feb 5, 2015, 03:06 PM IST
इक्बालकडून एजंटला कानातून रक्त येईपर्यंत मारहाण title=

मुंबई : दाऊदचा भाऊ एकबाल कासकरने इस्टेट एजंटला खंडणीसाठी कानातून रक्त येईपर्यंत बडवल्याचं समोर आलंय. तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी मोहम्मद सलीम अब्दुल जब्बार शेख या इस्टेट एजंटला कानातून रक्त येईपर्यंत बडवले. 

कानाला जबर दुखापत
कासकर याचा एक दाढीवाला सहकारी तर शेख याच्या डोक्यावर सातत्याने मारहाण करत होता. या मारहाणीमुळे शेख याचा कानात जबर दुखापत झाली आहे अशी माहिती या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. 

जबरी मारहाण
दरम्यान तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी शेख याला जबरी मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर आणि शब्बीर उस्मान शेख ऊर्फ शब्बू यांना शिवडी सत्र न्यायालयाने आज येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी शेख या इस्टेट एजंटला मारहाण केल्याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी कालच इक्बाल कासकर आणि त्याचा साथीदार शब्बीर उस्मान शेख ऊर्फ शब्बू याला अटक केली आहे.

या दोघांना रिमांडवर घेण्यासाठी शिवडी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी या आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची न्यायालयास माहिती दिली.

फुटेज तपासणार
हा गुन्हा ज्या जागी झाला त्या भागाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. हे फुटेज तपासणे तसेच मोटारसायकल हस्तगत करणे बाकी असल्याचेही या पोलिसांनी न्यायालयास सांगितले.

डॉनचा निर्लज्जासारखा हसत होता
पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केल्यानंतर डॉनचा भाऊ इक्बाल आरोपीच्या पिंजर्‍यात निर्लज्जासारखा हसत होता

पैसे कशासाठी असा सवाल केल्याने मारहाण
शब्बू याने या इस्टेट एजंटला इक्बाल कासकर राहत असलेल्या डांबरवाला बिल्डिंगमध्ये नेले. तेथे कासकर याने त्याच्याकडे त्याच्या व्यवसायाविषयी माहिती विचारून त्याच्याकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यावर या एजंटने त्याला मी हे पैसे कशाला देऊ असे विचारले. त्याच्या या प्रश्‍नाने संतप्त झालेल्या कासकर आणि त्याच्या दोघा साथीदारांनी या एजंटला कानातून रक्त येईपर्यंत बडवले अशी माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बावधनकर यांनी न्यायालयास दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.