मुंबई फायर ब्रिगेडची उंची वाढली, ताफ्यात ९० मीटर्स उंचीची शिडी दाखल

मुंबईत उंच इमारतीला आग लागल्यानंतर परिस्थिती कठीण होते. त्यामुळं अधिक उंचीवर जाणारी नवी गाडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालीय.

Updated: Aug 16, 2015, 08:09 PM IST
मुंबई फायर ब्रिगेडची उंची वाढली, ताफ्यात ९० मीटर्स उंचीची शिडी दाखल title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई: मुंबईत उंच इमारतीला आग लागल्यानंतर परिस्थिती कठीण होते. त्यामुळं अधिक उंचीवर जाणारी नवी गाडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालीय.

आधीच्या अग्निशमन दलाच्या गाडीतून साधारणपणे ६८ मीटर उंचीवर जाणं शक्य होतं. आता मात्र नवीन गाडीतून ९० मीटर उंच जाता येणं शक्य होणार आहे.
 

मुंबई महापालिका अग्निशमन दल मुख्यालय आणि भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र इथं लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महापालिका आयुक्त अजय मेहता, महापौर स्नेहल आंबेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सरकारमधील एकही मंत्री म्हणजे विनोद तावडे, प्रकाश मेहता, उपमहापौर कुणीही उपस्थित नव्हते. कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही भाजपकडून कोणीही उपस्थित नव्हतं. 

पाहा व्हिडिओ -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.