तुमच्या घरातील चिमुकल्यांसाठी ही बातमी जरूर वाचा

( दीपाली पाटील, झी २४ तास ) तुम्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये जाता, मॉलमध्ये जाता, सिनेमा हॉलमध्ये जाता. तेव्हा त्यांच्यावर तुमची बारीक नजर असते. ती हरवणार नाहीत, म्हणून तुम्ही काळजी घेता. मात्र तरीही तुमच्या मुलांचं अपहरण होऊ शकतं. 

Updated: Nov 25, 2015, 11:46 PM IST
तुमच्या घरातील चिमुकल्यांसाठी ही बातमी जरूर वाचा title=

मुंबई : ( दीपाली पाटील, झी २४ तास ) तुम्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये जाता, मॉलमध्ये जाता, सिनेमा हॉलमध्ये जाता. तेव्हा त्यांच्यावर तुमची बारीक नजर असते. ती हरवणार नाहीत, म्हणून तुम्ही काळजी घेता. मात्र तरीही तुमच्या मुलांचं अपहरण होऊ शकतं. 

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

ही व्हिडीओ क्लीप पाहून तुम्हाला धक्का बसेल. आपली लहानगी मुलं अनोळखी व्यक्तींशी किती सहजपणे गप्पा मारतात ते पाहा. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत जायलाही ती तयार होतायत.

हा सर्वे केलाय पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या काही शिक्षकांनी. मुंबईतले पार्क, मॉल्स, थिएटर्स, शाळा अशा ठिकाणी लहान मुलांसोबत त्यांनी एक प्रयोग केला. पालकांची त्यांनी  पूर्वपरवानगी घेऊन लहान मुलांना आमीष दाखवलं. हातात खेळणी, बाहुल्या आणि चॉकलेट्स घेऊन ते मुलांकडे गेले. त्यांच्याशी गप्पाही मारल्या. तेव्हा असं लक्षात आलं की,

१) यापैकी 87 टक्के मुलांनी अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारल्या
२) 81 टक्के मुलं चॉकलेट किंवा खेळण्यांच्या आमिषानं अनोळखी व्यक्तींसोबत जाण्यास तयार झाली
३) अनोळखी व्यक्तींसोबत जाताना मुलांनी पालकांकडे पाहिलंही नाही
४) 17 टक्के मुलं आपल्या पालकांसाठी रडू लागली
५) तर केवळ 13 टक्के मुलांनी या अनोळखी व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं

अनोळखी व्यक्तींसोबत बोलायचं नाही, त्यांच्याकडून चॉकलेट घ्यायचं नाही, अशा सूचना पालक सतत मुलांना देत असतात. पण तरीही ती आमीषांना बळी पडतातच. त्यामुळं आता अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.

विशेष म्हणजे हा सर्वे करताना आमची मुलं अनोळखी व्यक्तीसोबत जाणार नाहीत, असा विश्वास सर्वच पालकांनी व्यक्त केला होता. तुमचाही आपल्या मुलांबाबत असाच विश्वास असेल तर तुम्ही देखील आताच सावध व्हा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.