चप्पलांवर हिंदू देवतांचे फोटो, मुस्लिमांची अक्षरे छापण्यावर आळा घाला - उच्च न्यायालय

 चप्पलांवर मुस्लिम आणि हिंदू देवी देवतांचे फोटो अक्षरे छापले जातात अशा प्रकरणात पोलिसांनी योग्य तो शोध घेवून तपास करावा जेणेकरुन जातीय तेड निर्माण होण्याआधीच अशा प्रकारांना आळा घातला येईल. त्यामुळे यापुढे अशा प्रकरणात तज्ञांचा सल्ला घेवून प्रकरणे हाताळावीत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Updated: Dec 1, 2016, 07:35 PM IST
चप्पलांवर हिंदू देवतांचे फोटो, मुस्लिमांची अक्षरे छापण्यावर आळा घाला - उच्च न्यायालय  title=

मुंबई :  चप्पलांवर मुस्लिम आणि हिंदू देवी देवतांचे फोटो अक्षरे छापले जातात अशा प्रकरणात पोलिसांनी योग्य तो शोध घेवून तपास करावा जेणेकरुन जातीय तेड निर्माण होण्याआधीच अशा प्रकारांना आळा घातला येईल. त्यामुळे यापुढे अशा प्रकरणात तज्ञांचा सल्ला घेवून प्रकरणे हाताळावीत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 
 
 २०१४ साली ठाण्यात घडलेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीवर अंतिम निकाल देताना न्यायालयाने हे आदेश दिलेत. ठाण्यातील मोक्ष फुटवेअर रिटेलर नावाच्या एका कंपनीने चप्पलच्या सोलच्या खाली एम असा इंग्रजी शब्द लिहीला होता तो अल्लाह मुस्लिम देवतांना उद्देशून असल्याची तक्रार एका व्यक्तीने ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये केली होती. 
 
 परीणामी नौपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन मोक्ष फुटवेअरचे मालक, दिल्ली येथील चप्पल बनवणारा मॅन्युफॅक्चर यांना अटक करुन सर्व माल जप्त केला. पण त्यानंतर चप्पल बनवणा-या मुस्लिम होता, त्याचे कारागिर मुस्लिम होते तसच अनेक मुस्लिम लोकांनी हा सोल असलेली चप्पल घेतली होती. 
 
 त्यामुळे मोक्ष फुटवेअरचे मालक देजू शहा यांनी जाणीवपूर्वक रित्या हा प्रकार केला नसून एका उर्दू भाषा तज्ञाकडून हा चप्पलचा सोल करायला असता यांत कोणत्याही धर्माचा जातीचा अपमान होईल असे काहीच आक्षेपार्ह नसल्याचा अहवाल संबंधीत उर्दू भाषा तज्ञांनी नौपाडा पोलिसांना दिला. 
 
 अखेर आज झालेल्या अंतिम सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील एफआयआर रद्द ठरवून पेलीसांना अशी प्रकरणे योग्य रितीने हाताळण्याचे आदेश पोलीसांना दिलेत.