'हेक्स वर्ल्ड' भुजबळांना गोत्यात आणणार?

पैशाच्या गैरव्यवहाराप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Updated: Sep 9, 2015, 12:57 PM IST
'हेक्स वर्ल्ड' भुजबळांना गोत्यात आणणार? title=

मुंबई : पैशाच्या गैरव्यवहाराप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्या नावे असणाऱ्या मालमत्तांवर जप्ती येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

नवी मुंबईतल्या 'हेक्स वर्ल्ड' या रहिवाशी इमारतीच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी संचलनालानं ही पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत. 

या प्रकरणी पंकज आणि समीर भुजबळ यांच्या नावे असणाऱ्या एका प्लॉटवर ही जप्तीची कारवाई होणार आहे. या हेक्स प्रकल्पातून भुजबळ कुटुंबियांनी तब्बल 44 कोटी रुपये अवैधरित्या जमा केल्याचा आरोप आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.