मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांत सूर्य नमस्कार सक्ती विरोधात दाखल झालेल्या याचिका प्रकरणी मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिलासा मिळालेला नाही.
याचिकाकर्ते मसूद अन्सारी यांना हायकोर्टानं 'याबद्दल तुमच्याकडे राज्य सरकारकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे... तेव्हा तिकडे दाद मागा' अशी सूचना केली आहे.
मुंबई महापालिका कायदा ५२० (ब) अंतर्गत बीएमसीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडे दाद मागता येते.
यावर, अन्सारी यांनी आपण राज्य सरकारकडे दाद मागतो पण तोपर्यंत सूर्य नमस्कार सक्तीला स्थगिती देण्यात, यावी अशी मागणी केली.
पण बीएमसीच्या कायद्यानुसार मनपानं घेतलेला निर्णय राज्य सरकार किंवा न्यायालयानं स्थगिती दिली नसल्यास आयुक्तांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते, असं मुख्य न्यायाधीश मंजूला चेल्लूर यांनी स्पष्ट करत स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे सूर्य नमस्काराचा हा चेंडू राज्य सरकारचा कोर्टात गेला आहे.