तृप्ती देसाईना धक्के मारुन बाहेर काढू : अबू आझमी

हाजी अली दर्ग्यात महिलांन प्रवेश द्या, या मागणीसाठी आज संध्याकाळी तृप्ती देसाई दर्ग्यावर धडकणार आहेत. जर त्यांनी दर्ग्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धक्के मारुन  बाहेर काढू, अशा धमकीचा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिलाय.

Updated: Apr 28, 2016, 03:33 PM IST
तृप्ती देसाईना धक्के मारुन बाहेर काढू : अबू आझमी  title=

मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांन प्रवेश द्या, या मागणीसाठी आज संध्याकाळी तृप्ती देसाई दर्ग्यावर धडकणार आहेत. जर त्यांनी दर्ग्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धक्के मारुन  बाहेर काढू, अशा धमकीचा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिलाय.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यातील महिलांना असलेल्या प्रवेश बंदी विरोधात आंदोलन हाती घेतलेय. याबाबत त्यांनी आधीच घोषणा केली होती. नियोजित घोषणेप्रमाणे आज आंदोलन करणार आहेत. त्यांना अनेक मुस्लीम नेत्यांनी विरोध केलाय.

दरम्यान, दर्गा परिसरात अबू आझमी आपल्या समर्थकांसोबत दाखल झाले असून, शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख देखील याठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सकाळपासूनच परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय.