मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह अनेक गुजराती समाजच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला आहे.
शिवसेना ही मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी मुळात भाजपची असलेली पारंपारिक गुजारती व्होट बँक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी इतर समाजातील नेत्यांना शिवसेना पक्ष प्रवेश करून तयारी सुरू केली आहे. हेमराज शहा हे सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या सोबत भाजपच्या गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी हेही शिवसेनेत येत असल्यामुळे हा शिवसेनेनं भाजपला दिलेला धक्का आहे असं म्हटलं जातंय.