मुंबई एअरपोर्टवर 2.2 किलो सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाला मोठं यश मिळालं आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलीजेंस यूनिट AIU ने सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली 3 लोकांना अटक केली आहे. आरोपींकडून 2.2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 1 लाख 20 हजाराचे 2 आयफोन देखील जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 61 लाख रुपये असल्याचं बोललं जातंय.

Updated: Jan 22, 2017, 07:09 PM IST
मुंबई एअरपोर्टवर 2.2 किलो सोनं जप्त title=

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाला मोठं यश मिळालं आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलीजेंस यूनिट AIU ने सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली 3 लोकांना अटक केली आहे. आरोपींकडून 2.2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 1 लाख 20 हजाराचे 2 आयफोन देखील जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 61 लाख रुपये असल्याचं बोललं जातंय.

आरोपी अहमद थमीज दुबईहून हे सोनं घेऊन येत होता. त्याने हे सोनं सिलेंडरच्या शेपच्या कार वॉशिंग मशीनच्या मध्ये हे लपवलं होतं. अहमद थमीजने खुलासा केला आहे की, सोनं मुंबई एअरपोर्टच्या बाहेर इरशाद नावाच्या एका व्यक्तीला द्यायचं होतं. अहमद थमीजची चौकशी केल्यानंतर एअरपोर्टच्या बाहेर इरशादला ही अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी होत आहे.