खूशखबर! सोनं स्वस्त होणार!

२०१४-२०१५ या चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत कमी होऊन २५,५०० ते २७,५०० प्रति १० ग्राम इतकी होऊ शकते. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनं सांगितलं की, जगातील सोन्याच्या किमतीनुसार देशातही सोनं स्वस्त होईल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 9, 2014, 10:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२०१४-२०१५ या चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत कमी होऊन २५,५०० ते २७,५०० प्रति १० ग्राम इतकी होऊ शकते. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनं सांगितलं की, जगातील सोन्याच्या किमतीनुसार देशातही सोनं स्वस्त होईल.
रेटिंग एजंसीनं सांगितलं की घरगुती स्तरावर सोनं जागतिक किमतीनुसार स्वस्त होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर घसरून १,१५० ते १,२५० डॉलर प्रति औंसपर्यंत येईल, जो सध्या १३०० डॉलर प्रति औंर इतका आहे. सध्या भारतीय बाजारात सोन्याची किंमत २९ हजार ५०० ते ३० हजार रुपये प्रति ग्राम या दरम्यान आहे.
एजंसीच्या अंदाजानुसार अमेरिका आणि युरोपीय क्षेत्रामध्ये २०१४-१५मध्ये जीडीपी दरात वाढ होईल. त्यामुळं इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत होईल. तसंच अमेरिकेत पारंपारिक चलनविषयक धोरण हळूहळू बंद केल्यामुळं व्याजदरात फायदा होऊ शकतो, त्यामुळं सोन्यातील गुंतवणूक करण्यात ते परावृत्त होतील.
आगामी काळात सोन्यावरील निर्बंध उठवले तर आयात वाढून सोन्याची उपलब्धता आणखी वाढेल. त्यामुळेही सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून त्याचे दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपातील देशांची आर्थिक ‌स्थिती सुधारू लागली असल्याने डॉलरही वधारू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी तितकासा आकर्षक पर्याय नसेल, असा होरा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.