www.24taas.com, मुंबई
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत. मात्र, तूर्त तरी सोने खरेदी करू नका, कारण आणखी पाच दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचा दरात घट होऊन तो २५,३०० च्या घरात आला आहे.
कालच सोन्याचा भाव २५ हजारांवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरत आहे. २५,३००वर सोन्याचा दर खाली आला आहे. येत्या पाच दिवसात सोन्याच्या दरात घट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. दरम्यान, पुण्यात मंगळसूत्र खरेदीवर ५० टक्के सुट दिल्याने रेशनिंगप्रमाणे महिलांच्या सोने खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. मुंबईत सोन्याचा दर २५,६०० रूपये प्रति तोळा आहे. दरम्यान, सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,००० रूपयांपर्यंत सोन्याचा दर होण्याची शक्यता आहे.
शेअरमध्ये गुंतवणूक मंदी ओसरल्यानंतर जगभरात सोन्याऐवजी शेअरमध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे बाजारात सोन्याची आवक प्रचंड वाढली. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. त्यामुळे विवाह करणाऱ्यांनी सोने खरेदीबाबत वाट पाहिली तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. सोन्याच्या दरात घसरण सुरूच राहिल, अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेला आव्हान चीन, रशिया आणि मेक्सिकोतील बँकांनी अमेरिकी डॉलरचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सुवर्ण भांडार वाढवणे सुरू केले. त्यामुळे भाव अनिश्चित. तर भारत सरकारने सोन्यावर सीमा शुल्क दोन टक्क्यांनी वाढवले. आयात घटली. मात्र, तस्करी वाढल्याने आवक वाढली. तसेच गोल्ड फंडमधून बाहेर तूर्त तरी भाव वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे लोक गोल्ड फंडमधून पैसे काढून घेत आहेत. याचा परिणाम सोन्यावर झाला आहे.