गणपतीची आज प्रतिष्ठापना, दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

 घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. दीड दिवसांपासून 10 दिवसांसाठी हवाहवासा पाहुण्याचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आज दुपारी 1.40 पर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. तर गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Updated: Aug 29, 2014, 09:12 AM IST
गणपतीची आज प्रतिष्ठापना,  दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त title=

मुंबई : घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. दीड दिवसांपासून 10 दिवसांसाठी हवाहवासा पाहुण्याचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आज दुपारी 1.40 पर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. तर गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज सकाळी गणेशभक्त आपल्या बाप्पाचे आगमन कऱण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी गाडीतून, हातगाडी, रिक्षा, टॅक्सीमधून गणपती घरी आण्यात येत आहेत. आज गणेशचतुर्थी. घराघरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आज केली जाईल. दीड दिवसांपासून ते 10 दिवसांपर्यंत हा हवाहवासा वाटणारा पाहुणा आपल्या घरात असेल. पुढलं वर्षं सुखा-समाधानाचं जावं यासाठी त्याची मनोभावे पूजा केली जाईल. त्याला प्रसाद अर्पण केला जाईल. शास्त्रानुसार गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त नेमका कोणता आहे हे जाणून घेतले आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले सकाळपासून दुपारी 1.40 वाजेपर्यंत मुहूर्त आहे.

आकर्षक देखावे आणि भव्य मूर्तींचं मुंबईकरांना दर्शन पाहायला मिळणार आहे. गोरेगावमध्ये साकारला चॉकलेचा बाप्पा तर बर्फाचा आणि टिश्यू पेपरचे गणरायही मुंबईचं आकर्षण ठरत आहेत.

पुण्यात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मानाच्या गणपतींसह पुणेकरांच्या लाडक्या दगडूशेठ हलवाई गणपतीही प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. तर घरोघरी बाप्पाच्या स्वागताची धूम दिसत आहे.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.